SSC MTS Bharti : १० वी पास SSC मार्फत १२,५२३ पदांची भरती असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो SSC मार्फत १२०००+ MTS आणि Hawaladar पदांची भरती निघाली आहे. SSC MTS Havaldar या भरती मध्ये तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळणार आहे. या आर्टिकल मध्ये या पदांसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम, परीक्षा, निवड या बदल तुम्हाला माहिती मिळणार आहे.

केंद्र सरकारची नोकरी असून, हि परीक्षा तुम्हाला मराठी मधून देता येणार आहे. तुम्हाला मराठी language हा ऑपशन सिलेक्ट करता येणार आहे फॉर्म भरताना. staff selection commission म्हणजेच SSC मार्फत हि परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाईन Apply करण्यासाठी शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे.

मित्रांनो या भरती मध्ये सार्वाधिक जागा या महाराष्ट्र्रा मध्ये आहेत, UR, OBC, SC,ST,EWS अशा एकूण १२५२३ पदे आहेत. या मध्ये MTS Age Group 18-25 साठी एकूण ९३२९ आणि MTS Age Group 18-27 साठी एकूण २६६५ तसेच havaldar in CBIC साठी ५२९ पदे आहेत.

वय मर्यादा

या पदांसाठी वय मर्यादा किती असणार हे आपण आता पाहूया. या मध्ये वय मर्यादाच दोन ग्रुप आहेत, पहिल्या ग्रुप मागे MTS आणि havaldar या पदांसाठी वय मर्यादा १८ ते २५ आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये havaldar साठी १८ ते २७ आहे तसेच यामध्ये SC / ST साठी ५ वर्ष, OBC ३ वर्ष, Ex-serviceman ३ वर्ष सूट आहे.

परीक्षा स्वरूप

तुमची परीक्षा मराठी मध्ये घेतली जाणार जी कॉम्पुटर बेसेड असणार आहे. या computer based परीक्षे मध्ये MCQ असणार आहेत. ही परिक्षा दोन session मध्ये होणार आहे. पहिल्या session मध्ये numerical and Mathematical Ability आणि Reasoning ability and Problem Solving असे दोन विषय आहेत. दुसऱ्या Session मध्ये General Awareness आणि English language and comprehension असे दोन विषय आहेत. session २ मध्ये Negative marking असणार आहे.

परीक्षा शुल्क

या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे हे आता पाहूया. जर तुम्ही OPEN आणि OBC Candidate असाल तर तुम्हाला १००रु परीक्षा शुल्क आहे. तसेच जर तुम्ही women candidate, SC, ST, PwBD आणि ESM (ex serviceman) असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्क शून्य आहे.

परीक्षा केंद्र

महाराष्ट्रा मध्ये तुम्हला परीक्षा केंद्र अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी असणार आहे.

SSC MTS Havaldar या भरतीच्या जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या मध्ये तुम्हाला या जाहिरातीबद्दलची आधिक माहिती मिळेल.

SSC MTS 2023 Notification PDF

Leave a Comment